संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

जम्मू-कश्मीर पोलीस महानिर्देशक लोहीयांची हत्या करणाऱ्या नोकराला अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत कुमार लोहिया यांच्या काल रात्री उशिरा झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी अद्याप ही घटना दहशतवादी घटना मानलेली नसून या प्रकरणी नोकर यासिर अहमद याला मुख्य आरोपी म्हणून अटक केली आहे. लोहिया यांच्या हत्येपासून तो फरार झाला होता आणि संशयाची सुई त्याच्याकडेच फिरत होती.

एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, 1992 बॅचचे आयपीएस अधिकारी लोहिया (52) हे शहराच्या बाहेरील त्यांच्या उदयवाला निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले आणि त्यांचा गळा चिरण्यात आला होता. गुन्ह्याच्या ठिकाणी प्राथमिक तपासात लोहियाने पायाला तेल लावले असावे. ज्यात सूज दिसून येत आहेत.मारेकऱ्याने लोहिया यांचा गळा कापण्यासाठी तुटलेल्या केचपच्या बाटलीचा वापर केला आणि नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.अधिकाऱ्याच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या वॉचमनला त्यांच्या खोलीत आग लागल्याचे दिसले. खोलीचा दरवाजा आतून बंद होता, तो तोडावा लागला. हत्येनंतर तो सीसीटीव्हीत धावताना पोलिसांना दिसत होता. पोलीस महासंचालकांच्या घरी गेल्या सहा महिन्यापासून काम करत होता. तो सुरुवातीपासूनच उग्र स्वभावाचा होता. जम्मू-काश्मीर डीजी जेलच्या हत्येनंतर पोलीस महासंचालक दिलबाग सिंग आणि मुख्य सचिव अरुण मेहता हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. फॉरेन्सिक टीमचा तपासही सुरू आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात दहशतवादी संघटनेचा हात असल्याच्या शक्यतेचा इन्कार केला आहे.

आरोपी यासिरचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रात्रभर फिरत होती. त्यानंतर त्याला कानाचक येथून अटक करण्यात आली. यासिर अहमद हा रामबनचा रहिवासी आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांना यासिरची डायरीही सापडली असून त्यात त्याने मृत्यूशी संबंधित गोष्टी लिहिल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिर नैराश्याने त्रस्त होता आणि डायरीत त्याने लिहिले आहे की त्याला जीवनाचा तिटकारा आला आहे. नोकर मुख्य आरोपी आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेलेले हत्यार,आरोपीची एक डायरीही जप्त करण्यात आली आहे. त्या डायरीवरून आरोपी त्यावरून तो डिप्रेशनमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami