जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आज सुरक्षा दलाने लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केले. जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे आयजी कुमार यांनी ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अनंतनागच्या कोकरनागमधील वैलू गावात लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसह संयुक्त कारवाई करून दहशतवाद्यांना घेरले. यावेळी दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. सुरक्षा दल आणि पोलिसांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आणि तीन दहशतवाद्यांना खात्मा केला.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये गुरुवारी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. चकमकीत ठार झालेले सर्व दहशतवादी अल-बदर या दहशतवादी संघटनेचे होते.

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami