संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

जम्मू-काश्मीरच्या राजौरीत बसदरीत कोसळून ५ ठार, २५ जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या राजौरीत बस दरीत कोसळून अपघात झाला. त्यात ५ जणांचा मृत्यू झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यातील ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत जम्मू-काश्मीरमध्ये झालेला हा दुसरा मोठा अपघात आहे.
जम्मू येथून पुँछकडे निघालेली बस राजौरीत आली तेव्हा घाटात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ती दरीत कोसळून अपघात झाला. याची माहिती मिळताच लष्कर, पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले. दरीत कोसळलेल्या बसमधून ५ मृतदेह बाहेर काढले. या अपघातात २५ जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यातील ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. राज्यपाल मनोज सिन्हा यांनी याविषयी शोक व्यक्त केला आहे. जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. यापूर्वी बुधवारी पूँछमध्ये असाच मोठा अपघात झाला. वेगात असलेली बस २५० फूट दरीत कोसळून १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात २८ जण जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना २४ तासांत हा दुसरा मोठा अपघात झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami