जम्मू-काश्मीरमधील चकमकीत ४ जहाल दहशतवाद्यांचा खात्मा

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या कुलगाम आणि पुलवामा या जिल्ह्यांमध्ये आज २ ठिकाणी झालेल्या २ चकमकींमध्ये ४ जहाल अतिरेकी ठार झाले आहेत. सुमारे ५ तास ही घनघोर चकमक सुरू होती. त्यानंतर या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले. कोणतेही नुकसान होऊ न देता सुरक्षा दलाने ही कारवाई केली, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करणाऱ्या अतिरेक्यांविरुद्ध सुरक्षा दलाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यात गुरुवारी कुलगाम आणि पुलवामा येथे अतिरेकी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्या चकमक झाली. त्यात कुलगाम येथील चकमकीत २ अतिरेकी ठार झाले. त्यानंतर पुलवामाच्या पुचल येथील चकमकीतही सुरक्षा दलाने २ अतिरेक्यांना कंठस्नान घातले. विशेष म्हणजे या दोन्ही कारवायांमध्ये सुरक्षा दलाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यानंतर या भागात शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. या चकमकीत मारलेल्यामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या २ अतिरेक्यांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami