जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी दहशतवाद्यांचे ड्रोन पाडले; ५ किलो आयईडी हस्तगत

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

जम्मू – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच आहेत. आज सकाळीच लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर आणि एका दहशतवाद्याला जवानांनी ठार केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचेही समजले. मात्र भारतीय जवानांनी हा कट उधळून लावत दहशतवाद्यांचे ड्रोन पाडले. या ड्रोनमधून तब्बल पाच किलो आयईडी हस्तगत झाले आहे.

१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशात दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पाकिस्तान ड्रोनच्या मदतीने आयईडी पुरवून मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराला अगोदरच मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्कराने रणनिती आखून भारतीय सीमेच्या आठ किलोमीटर आत हे ड्रोन पाडले. अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी याबाबत सांगितले, ‘दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद अखनूरजवळ ड्रोनच्या मदतीने हल्ला करणार आहे. याबाबतची माहिती आम्हाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे आम्ही रणनिती आखली. रात्री १ च्या सुमारास आम्ही ड्रोन पाडले. त्यानंतर पाकिटबंद आयईडी उचलण्यासाठी कोणीतरी येईल याची आम्ही वाट बघत होतो. मात्र तिथे कोणीही आले नाही. आयईडी कुठेतरी प्लांट करण्याचा हा कट होता. परंतु भारतीय लष्काराने दहशतवाद्यांचा हा कट हाणून पाडला. हे ड्रोन चीन आणि तायवानमधील स्पेअरपार्टने तयार करण्यात आले आहे.’ त्याचबरोबर ‘मागच्या दीड वर्षात १६ एके ४७ रायफल, तीन एम-४ रायफल, ३४ पिस्तोल, १५ ग्रेनेड आणि १८ आयईडी हस्तगत करण्यात आले आहेत. काही ड्रोनच्या मदतीने पैसेही पाठवण्यात आले होते. जवळपास ४ लाखांची रोख हस्तगत करण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा ड्रोनच्या मदतीने काश्मीरमध्ये हल्ले करण्याचा कट रचत आहे’, असेही मुकेश सिंह म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami