संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

जम्मू-काश्मीर व नोएडासह उत्तर भारत भूकंपाने हादरला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरपासून नोएडापर्यंत संपूर्ण उत्तर भारत आज सकाळी भूकंपाने हादरला. सकाळी ९.४५ च्या सुमारास झालेल्या या भूकंपाची तीव्रता ५.७ रिश्‍टर स्केल एवढी नोंद झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्थान-ताजिकिस्तान सीमाभागात होता. यात कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जम्मू-काश्मीर, नोएडा आणि दिल्ली परिसरात आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास भूकंप झाला. त्यात २० ते ३० सेकंदांपर्यंत जमीन थरथरत होती. घरातील भांडी हलत होती. त्यामुळे नागरिक घाबरले. अनेक जण इमारती आणि घराबाहेर पळाले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. उत्तराखंड आणि उत्तर काशीच्या काही भागातही पहाटे भूकंपाचे हादरे जाणवले. उत्तरकाशी जिल्ह्यात पहाटे ३.१५ च्या सुमारास भूकंप झाला. त्याची तीव्रता ३.६ रिश्‍टर स्केल होती. त्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटर खोलवर होता, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami