संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

जया बच्चन यांनाही कोरोनाची बाधा, चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबईत – करण जोहरचा बहुचर्चित चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवर सध्या कोरोनाने आक्रमण केले आहे.काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शबाना आझमी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आता अभिनेत्री जया बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जया बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

जया बच्चन यांच्या संपूर्ण कुटुंबाला २०२० मध्ये कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचीही कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली होती. पण त्यावेळी जया यातून बचावल्या होता. मात्र यावेळी त्यांना चित्रपटाच्या सेटवर कोरोनाची लागण झाल्याने बोलले जात आहे.

शबाना आझमी आणि जया बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणाने करण जोहरने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाचे चित्रिकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही अभिनेत्री या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे पुढील चित्रिकरण दिल्ली येथे होणार होते. मात्र आता ते पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांमध्ये बऱ्याच बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राज्यातही कोरोनाचे संक्रमण वाढताना दिसत आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ बद्दल बोलायचं तर या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका आहेत.तर अभिनेत्री शबाना आझमी आणि जया बच्चन या देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami