संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

जळगावात खडसे समर्थकांना 6 वर्षांसाठी निलंबित केले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जळगाव : भुसावळ नगरपालिकेत एकनाथ खडसे यांच्या समर्थकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. भुसावळ येथील माजी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. भुसावळ नगरपालिकेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या एक दिवस आधीच तत्कालीन भाजपच्या नगराध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या खडसे समर्थकांवर निलंबनाची कारवाई झाली असून माजी नगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांना 6 वर्षे निवडणूक बंदी राहील.

सध्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडीने धक्के बसत असतानाचा आता राष्ट्रवादी काँग्रेसला जळगावमध्ये मोठा धक्का बसला आहे. भुसावळ येथे २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्य चिन्हावर रमण भोळे हे लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले होते. त्यांच्यासोबत भाजपचे पंचवीस नगरसेवक निवडून आले होते. मात्र, त्यांची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामुळे त्यांना अपात्र करावे यासाठी भाजपच्या नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन जिल्हाधिकार्‍यांनी निकालात तत्कालीन नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवक बोधराजू चौधरी, अमोल इंगळे, प्रमोद नेमाडे, लक्ष्मी मकासरे, शोभा नेमाडे, मेघा् वाणी, किरण कोलते, शैलजा नारखेडे, सविता मकासरे यांना अपात्र करण्यात आले होते.जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयाला या 10 जणांनी नगरविकास विभागाकडे दाद मागितली.यावर दोन्ही बाजूंची सुनावणी झाल्यानंतर नगरविकास विभागाच्या प्रधानांनी या सर्वांचे अपील फेटाळले असून जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे जळगावात भाजपच्या गिरीश महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देण्यासाठी एकनाथ खडसे प्रयत्न करत होते. मात्र नुकत्याच झालेल्या कारवाईने खडसे आणि राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami