संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

जळगावात टेंपो-रिक्षा अपघातात 3 जण जागीच ठार! 18 जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जळगाव : शहापूरजवळील इच्छापूर-इंदूर महामार्गावर आयशर आणि ऑटो रिक्षाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात महाविद्यालयीन दोन विद्यार्थिनी व रिक्षाचालक जागीच ठार झाले. तर 18 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून तर मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघाताची नोंद शाहपूर पोलिसात नोंद झाली असून टेंपो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी बुऱ्हाणनपूरच्या दिशेने जात असताना समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमींनी रुग्णालयात पाठवण्यात आले असून ठार झालेल्या विद्यार्थिनींचे मृतदेह बुऱ्हानपूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.अपघातातील सर्व विद्यार्थी बंबरा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जळगावमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून ऑटो रिक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात भरधाव वेगामुळे अपघात होत असल्याने वाहनांच्या वेगमर्यादेवर निर्बंध आणण्याची मागणी करण्यात येत आहे.सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami