शिरुर – तालुक्यातील थेरगाव येथील जवान सुर्यकांत शेषराव तेलंगे (35) हे पठाणकोट जिल्ह्यातील मिरथल छावणी परिसरात आज दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाले. त्यांचे पार्थिव उद्या त्यांच्या मूळ गावी आणले जाणार आहे. सूर्यकांत यांच्या निधनाची माहिती समजताच गावावर शोककळा पसरली आहे. गावकर्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवत सूर्यकांत तेलंगे यांना आदरांजली वाहिली. त्यांचे दहावीपर्यर्ंतचे शिक्षण प्रेमनाथ विद्यालयात तर बारावीपर्यर्ंतचे शिक्षण लोकजागृती विद्यालयात झाले होते.