संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

जागतिक बँकेने विकास दराचा अंदाज घटवला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : भारतातील अर्थव्यवस्था ही जगातील सर्वांत वेगावान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते.मात्र जागतिक बँकेने भारताचा विकासदर एक टक्क्यांनी कमी केला आहे. २०२२-२३ या साठी भारताच्या विकासदराचा अंदाज ७. ५ टक्के दर्शवला होता. मात्र आता रशिया आणि युक्रेन युद्धाचा भारतावर परिणाम झाला असून भारताचा विकासदर ६.५ टक्के वर्तवण्यात आला आहे.

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध आणि जागतिक मुद्रा धोरण काटेकोरपणे राबवण्यात येत असल्याने त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ, शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.जागतिक बँकेने भारताच्या विकासदरामध्ये घट करण्याची ही कारणे सांगितली आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी जारी करण्यात आलेल्या अहवालात भारताची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत मजबूत असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी भारताचा विकासदर ८.७ टक्के इतका होता.गेल्या काही महिन्यांपासून भारतासह विविध देशातील कंपन्यांकडून जागतिक आर्थिक मंदीचे सावट येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गुगल सह अनेक टेक कंपन्यांकडून कर्मचारी कपात केली जात आहे.दरम्यान जागतिक बँकेच्या मते, कोरोनानंतर भारत इतर देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा वेगाने कसर भरून काढत आहे. दक्षिण आशियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ हॅन्स टिमर म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेने दक्षिण आशियातील इतर देशांच्या तुलनेत चांगली कामगिरी केलेली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami