संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

जागतिक मंदीनंतर FII कडून भारतीय शेअर बाजारात विक्रमी विक्री

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याच्या भीतीने भारतीय शेअर बाजारातून विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (Foreign Institutional Investor) विक्री करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार देशांतर्गत बाजारातून सातत्याने विक्री करत आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 10 अब्ज डॉलरची निव्वळ विक्री केली आहे.

वाढत्या व्याजदराच्या भीतीने परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जानेवारी 2022 मध्ये भारतीय शेअर बाजारातून निव्वळ 4.8 अब्ज डॉलर काढले. कोणत्याही महिन्यात काढलेली ही दुसरी सर्वात मोठी रक्कम आहे. तर यापूर्वी 2008 मध्ये विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 8-10 अब्ज डॉलर्स काढले होते.

ब्लूमबर्ग इंटेलिजन्सच्या मते, 2008च्या मंदीनंतर जगभरातील देशांतर्गत स्टॉकमधून ही सर्वात मोठी एक्झिट आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, सततची विक्रीमुळे ज्या कंपन्यांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा मोठा हिस्सा आहे, त्यांच्या शेअर्सना दिलासा मिळेल. परदेशी गुंतवणूकदारांचा मोठा हिस्सा असलेल्या कंपन्यांचे शेअर्स वाढू शकतात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami