संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

जाणून घ्या वेदांत फॅशन्स लिमिटेड आयपीओबाबत…

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

एथनिक वेअर ब्रँड ‘मान्यवर’ आयपीओ बाजारात दाखल होत आहे. मान्यवर ब्रँडची मालकी असलेल्या वेदांत फॅशन्स लिमिटेडची इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) 4 फेब्रुवारी रोजी खुली होणार असून त्यासाठी 8 फेब्रुवारीपर्यंत बोली लावता येणार आहे. कंपनीने सप्टेंबर 2021 मध्ये सेबीकडे आयपीओसाठीची मसुदा कागदपत्रे सादर केली होती.

वेदांत फॅशन 16 फेब्रुवारी रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग होण्याची योजना आहे. या आयपीओ अंतर्गत कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत आणि सर्व शेअर्स विक्रीसाठी ऑफर फॉर सेल असतील. या अंतर्गत कंपनीचे विद्यमान प्रवर्तक आणि शेअरहोल्डर्स त्यांचे सुमारे 3.636 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवतील.

ऑफर-फॉर-सेल (OFS) मध्ये, 1.746 कोटी शेअर्स राइन होल्डिंग्स लिमिटेड, केदारा कॅपिटल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडचे सुमारे 7,23,000 शेअर्स आणि रवी मोदी फॅमिली ट्रस्टचे 1.818 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले जातील. सध्या वेदांत फॅशनमध्ये राईन होल्डिंग्सचा 7.2 टक्के हिस्सा आहे. केदारा AIF कडे 0.3 टक्के हिस्सा आहे. तर 74.67 टक्के हिस्सा रवी मोदी फॅमिली ट्रस्टकडे आहे.

दरम्यान, वेदांत फॅशन पुरुषांच्या एथनिक वेअर सेगमेंटच्‍या व्‍यवसायात प्रामुख्याने गुंतलेली आहे. त्यांचा फ्लॅगशिप ब्रँड ‘मान्यवर’ भारतीय वेडिंग आणि सेलिब्रेशन वेअर विभागातील मार्केट लीडर आहे. याशिवाय वेदांत फॅशनमध्ये त्वामेव, मंथन, मोहे आणि मेबाज, इत्यादी ब्रँडदेखील आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami