संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

‘ जायकवाडी ” चे २७ दरवाजे उघडले! चार जिल्ह्यांना दिला धोक्याचा इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पैठण – औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण काठोकाठ भरलेले असताना नाशिक व अहमदनगर जिल्ह्यासह जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या धरणात १ लाख क्युसेक अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाली आहे. यामुळे धरणाच्या आपत्कालीन दरवाजासह सर्व २७ दरवाजे ४ फूटाने वर उचलून धरणातून होणारा विसर्ग १ लाख १३ हजार १८४ क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. त्याचप्रमाणे पाण्याची ही आवक लक्षात घेता पैठण शहरातील नदीकाठच्या ६२० कुटुंबांचे स्थलांतर करण्याच्या नोटीसा प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच औरंगाबादसह जालना,परभणी आणि नांदेड अशा चार जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सध्याची विसर्ग दीड लाख क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात येणाची शक्यता धरण प्रशासनाने वर्तविल्याने शनिवारी सायंकाळी पैठणकरांचेही धाबे दणाणले होते. शहरात पाणी घुसेल या भितीने नदीकाठच्या भागासह व्यापाऱ्यांचीही धावपळ उडाली. शनिवारी दुपारनंतर गोदावरी नदी ४६ हजार व प्रवरा नदी ५७ हजार क्युसेक्सने भरून जायकवाडी धरणात दाखल होण्यास प्रारंभ झाला यामुळे दुपारी पाच नंतर जायकवाडीतून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून सायंकाळी सात वाजेपर्यंत  १,१३,१८४ क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला.यामुळे पैठण शहरातील नदीकाठचा सखल भाग,मोक्षघाट पाण्याखाली आले आहे. ग्रामीण भागातील गोदावरी नदीला येऊन मिळणाऱ्या छोट्या मोठ्या नद्या नाले व ओढ्यातून पाणी उलटे प्रवाही झाले आहेत. पैठणमध्ये मौलाना साहब दर्गा परिसरातील १०० कुटुंबाचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रंगारहट्टी ते गागाभट्ट चौक्व मोक्ष घाट पर्यंतची २० घरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami