संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

जालन्यात जाफराबाद तालुक्यात ढगफुटी! नद्या-नाल्यांना पूर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जालना – जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे.आज सकाळपासूनच जाफराबाद तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य जोरदार पाऊस पडल्याने नद्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले तर शेतातील पिके आणि माती वाहून गेली.

राज्‍यातील अनेक भागांमध्‍ये मुसळधार पाऊस होत आहे. ढगफुटी सदृश्‍य पाऊस होत असल्‍यामुळे पावसाचे अक्राळविक्राळ रूप पहावयास मिळत आहे. यात जाफराबाद तालुक्‍यात ढगफुटी झाल्‍याने सर्वच नद्या- नाल्‍यांना पूर आला आहे.यामुळे परिसरातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी नळविहिरा, भातोडी, जाफराबाद, वरखेडा वीरो, आळंद, सावरगाव मस्के, बोरखेडी चिंच, हिवरा काबली, हिवराबळी, हरपाळा, निमखेडा, देऊळगाव, उगले यास तालुक्यातील गावात जोरदार पाऊस पडल्याने मोठं नुकसान झाला आहे.शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जाफराबाद तालुक्यातील शेडनेट, शेततळे, फळबागा, ऊस, कपाशी, सोयाबीन, तुर, मक्का पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर पावसाने तालुक्यात सणावर एक प्रकारे संक्रांत आणली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami