सातारा – जावली तालुक्यातील कुसुंबी येथील काळूबाई समजल्या जाणाऱ्या प्रसिद्ध काळेश्वरी देवीची यात्रा यंदाही कोरोनाच्या पार्शभूमीवर रद्द करण्यात आली आहे. रविवार २० फेब्रुवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. मात्र यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने ही यात्रा साजरी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन, काळेश्वरी देवी ट्रस्ट आणि ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.
यात्रेनिमित्त काल बुधवारी देवीची ध्वजकाठी उभारून केवळ ग्रामस्थांच्या उपस्थितीत यात्रेला प्रथा म्हणून सुरुवात करण्यात आली. उद्या शुक्रवार १८ फेब्रुवारी रोजी देवीचा रुद्राभिषेक सकाळी सात वाजता होणार असून शनिवारी जागर होणार आहे. रविवार हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. दरम्यान यंदाही कोरोनामुळे साध्या पद्धतीने यात्रा पार पाडण्याबाबत तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला तहसीलदार राजेंद्र पोळ,कुसुंबी गावच्या सरपंच पुष्पा चिकणे,विश्वस्त बाजीराव चिकणे आणि मोजक्या संख्येने ग्राम्स्थ्व प्रशासकीय पदाधिकारी उपस्थित होते.