संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

जावली तालुक्यातील भणंग गावात चक्क सर्व अपक्ष उमेदवार विजयी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा – सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील भणंग या एकमेव लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल समोर आला आहे.भाजप आणि राष्ट्रवादी पॅनलचे दोन्ही प्रतिस्पर्धी सर्व उमेदवार पडले असून सर्व अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी आज पार पडली.अनेक अटीतटीची स्पर्धा दिसून आली.परंतु, जावली तालुक्यातील भणंग या एकमेव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल समोर आला आहे. या गावातील भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे दीपक पवार यांच्या पॅनलचे एकूण १४ उमेदवार दोन्हीही पॅनलमधून निवडणूक लढवत होते.परंतु, दोन्ही पॅनलचे परस्पर विरोधी सर्व उमेदवार या निवडणुकीत पडले असून अपक्ष उमेदवारांची लॉटरी लागली असल्याने हा निकाल लक्षवेधी ठरला आहे. या निकालामुळे भणंग गावात प्रथमच अभूतपूर्व इतिहास घडला आहे.यामध्ये थेट सरपंच निवडणुकीत राष्ट्रवादीचे दीपक पवार यांच्या गटाचे गणेश साईबाबा जगताप हे उमेदवार निवडून आले. तर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाच्या पॅनल मधील एक उमेदवार निवडून आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami