संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

‘जिथे आहात तिथेच रहा’, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सूचना

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरूच आहे. अशावेळी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असले तरी आता परिस्थिती नियंत्रणात नसल्याने सातत्याने अडचणी समोर येत आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना सूचना जारी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या पूर्वेकडील भागात सध्या परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता भारतीयांना जिथे आहात तिथेच राहण्यास सांगण्यात आले आहे.

नव्या आदेशानुसार, युक्रेनमधील भारतीयांनी घाबरून न जाता स्वत:ला सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. लवकरच युक्रेनमध्ये अडकलेल्या या सर्वांना भारतात परत आणण्यात येईल. असे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, युद्धाचा पाचवा दिवस असून, परिस्थितीत थोडी सुधारणा होताच पूर्वेकडील भागातील लोकांना बाहेर काढणे शक्य होणार आहे. यादरम्यान परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीची बैठक झाली, ज्यामध्ये युक्रेन-रशियाचा युद्धाचा मुद्दा गाजला. या बैठकीत सरकारने सांगितले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अडकलेल्या लोकांना आणण्यासाठी सरकारने नियंत्रण कक्षही स्थापन केला आहे. एकीकडे पोलंड आणि हंगेरीसारख्या देशांनी युक्रेनमधून पळून जाणाऱ्या नागरिकांचे स्वागत केले आहे, तर दुसरीकडे युक्रेन सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही भारतीय नागरिकांनी पोलंडच्या सीमेवर अडचणी येत असल्याचे सांगितले आहे.

कीव्हमधील भारतीय दूतावासाने रविवारी सांगितले की, भारतीय नागरिकांना युक्रेनमधून रोमानिया आणि हंगेरीमार्गे परत आणले जात आहे. तर रुचिर कटारिया नावाच्या स्वयंसेवकाने असोसिएटेड प्रेसला सांगितले की, मेडिका सीमा ओलांडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भारतीयांना रोमानियाला जाण्यास सांगण्यात आले. अहवालानुसार, पोलंडमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झालेल्या इतर काही भारतीय नागरिकांना पोलिस अधिकारी आणि धर्मादाय संस्थांनी स्थापन केलेल्या निवारागृहात राहण्यासाठी जागा दिली जात नाही. कटारिया यांच्या पत्नी मॅग्डालेना बारसिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा युक्रेनच्या नागरिकांसाठी राखीव असल्याचे भारतीय नागरिकांना सांगितले जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami