नवी दिल्ली – रिलायन्स, जिओच्या नेटवर्कला भारतात सकाळी ११ वाजल्यापासून समस्या येत आहेत. अनेक युजर्सच्या मोबाईलवर काही वेळापासून अचानक संपूर्ण नेटवर्क गेल्याचं दिसून येत आहे. याचा फटका अनेक युजर्सला बसला आहे. अनेक युजर्सने काही वेळ थांबून आपली तक्रार नोंदवायला सुरुवात केली आहे. अनेकांना नेटवर्कची समस्या उद्भवत असल्याची माहिती नेटकऱ्यांनी ट्वीटरवर दिली. अनेकांनी रिलायन्स जिओच्या अधिकृत ट्विटर हँडलवर तक्रारीही केल्या आहेत. सोशल मीडियावर जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याचे मेसेजही पोस्ट केले जात आहेत.
दरम्यान, नेटवर्कची समस्या कशामुळे उद्भवली आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही. तसेच कंपनीकडूनदेखील यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहितीही देण्यात आलेली नाही. रिलायन्स, जिओ ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. दरम्यान, रिलायन्स जिओचे नेटवर्क डाऊन झाल्यानंतर अनेकांनी ट्रोलही करण्यास सुरूवात केली आहे. सारखा सारखा तुमचा फोन रिस्टार्ट करू नका, नेटवर्क डाऊन आहे, असे म्हणत एका युझरने प्रतिक्रिया केली आहे. तर एकानं थोडा वेळ झोपून घेतो, असे म्हणत मजेशीर प्रतिक्रिया केली आहे.