संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी तिघांना जन्मठेप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक :२०११ मध्ये संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हात्यकांडचा आज निकाल लागला असून मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयाचे न्यायमूर्ती डी वाय गोंड यांनी तीन आरोपीना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला २५ जानेवारी २०११ रोजी अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे मनमाड पासून जवळ असलेल्या इंधनाच्या अवैध अड्डयावर छापा मारण्यासाठी गेले असता इंधन माफियानी त्यांना जिवंत जाळून ठार मारले होते. या घटनेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरला होता. यामध्ये एकूण पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी मुख्य आरोपी पोपट शिंदे हा देखील या प्रकरणात जळाले होते त्यांनंतर त्याचा मृत्यू झाला होता. तर कुणाल शिंदे हा त्यावेळी अल्पवयीन होता. त्यामुळे त्याच्यावर बाल न्यायालयात खटला सुरु आहे. याशिवाय मच्छिंद्र सुवडकर, राजू शिरसाठ आणि अजय सोनवणे हे आरोपी होते. याच तिघांना आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मनमाड जवळ पानेवाडी गावाजवळ अनेकांनी त्यावेळी हॉटेल सुरू करून त्याआडून इंधनाचा काळाबाजार सुरु केला होता. याची कुणकुण अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना लागल्याने त्यांनी शिंदे यांच्या हॉटेलवर धाड टाकली होती. याचवेळी आरोपींनी सोनवणे यांच्यावर इंधन टाकून जिवंत जाळून ठार मारले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेला आज ११ वर्षे उलटून गेली असतांना आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे एकप्रकारे अधिकारी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami