संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

जीएसटी चुकवेगिरीत मुंबई अव्वल! ६८ जणांवर कारवाई

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – तीन वर्षांपासून राज्याच्या जीएसटीच्या उत्पन्नात वाढ होत असली तरी जीएसटी चुकवेगिरींचीही संख्या वाढत आहे. राज्यात सर्वाधिक जीएसटी चुकवेगिरी मुंबईत झाली आहे. यंदा राज्यात एकंदर ६८ कर चुकवेगिरीची प्रकरणे आढळली. त्यापैकी एकट्या मुंबईतील ४५ प्रकरणे आहेत. जीएसटी चुकवेगिरीचे मुंबईतील प्रमाण ६६.२ टक्के आहे. त्यांच्यावर कारवाई केली आहे, अशी माहिती जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
राज्य सरकारच्या जीएसटी महसूलात अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्याच्या जीएसटी उत्पन्नाने दरमहा २२ हजार कोटींचा टप्पा गाठला आहे. असे असताना कर चुकवीगिरीचेही प्रमाण वाढत आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात कर चुकीगिरीची ११ प्रकरणे उघडकीस आली होती. २०२१-२२ मध्ये त्यात घट होऊन हा आकडा ९ पर्यंत खाली आला. मात्र यंदा त्यात मोठी वाढ झाली. राज्यात कर चुकवेगिरीची ६८ प्रकरणे उघडकीस आली. त्यापैकी एकट्या मुंबईतील ४५ प्रकरणे आहेत. कर चुकवेगिरीत पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेथे कर चुकवेगिरीची ८ प्रकरणे सापडली. त्यानंतर रायगडचा नंबर लागतो. तेथे ४ प्रकरणे आढळली आहेत. औरंगाबाद, कोल्हापूर आणि पालघर मध्ये प्रत्येकी २ कर चुकवेगिरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात जीएसटी अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात कर चुकवेगिरीला आळा घालण्याच्या आणि कारवाई करण्याच्या सक्त सूचना त्यांना दिल्या होत्या. या बैठकीत अधिकाऱ्यांनी ही आकडेवारी सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami