नवी दिल्ली – जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची ४९ वी बैठक येत्या शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत होणार आहे.जीएसटी परिषदेची ही बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याआधीची बैठक १० डिसेंबर २०२२ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली होती.
जीएसटी परिषदेच्या या ४९ व्या बैठकीत ऑनलाइन गेमिंग आणि जीएसटी अपील न्यायाधिकरणावरील मंत्र्यांच्या गटाचा प्रलंबित अहवाल सादर केला जाणार नसल्याची शक्यता केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष विवेक जोहरी यांनी व्यक्त केली आहे.या बैठकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल असेही जोहरी म्हणाले.मागील बैठकीत भौतिक पुराव्याच्या छेडाछेडीसह तीन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे गुन्हेगारी ठरवण्याची शिफारस केली होती.तसेच जीएसटी कायद्यांतर्गत परिभाषित केलेल्या कोणत्याही गुन्हेगारी गुन्ह्यावर खटला चालविण्यासाठी कर रकमेची मर्यादा १ कोटी रुपयांवरून वाढवून २ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.