संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

जीवनशैलीवर परिणाम करणारा ‘फ्युचर ग्रुप’

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

फ्युचर ग्रुप हा एक भारतीय समूह आहे, ज्याची स्थापना किशोर बियाणी यांनी केली असून त्याचे मुख्यालय मुंबईत आहे. बिग बझारसारख्या लोकप्रिय सुपरमार्केट चेन आणि फूड बझार, ब्रँड फॅक्टरी, सेंट्रल इत्यादींसारख्या जीवनशैलीबाबतच्या स्टोअर्ससह कंपनीचे भारतीय रिटेल आणि फॅशन क्षेत्रात लक्षणीय अस्तित्त्व आहे. ‘फ्यूचर रिटेल लिमिटेड’ आणि ‘फ्यूचर लाइफस्टाइल फॅशन लिमिटेड’ या फ्यूचर ग्रुपच्या दोन ऑपरेटिंग कंपन्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे या बीएसईवरील सूचीबद्ध टॉप रिटेल कंपन्यांपैकी एक आहेत.

फ्युचर ग्रुपने सर्व क्षेत्र, वर्ग आणि उद्योगांतील जीवनशैलीवर परिणाम केला आहे. भारतातील अग्रगण्य किरकोळ विक्रेता म्हणून समूह आपल्या ग्राहकांसाठी दर्जेदार सेवा, रोमांचक ऑफर आणि उत्पादनांची असंख्य श्रेणी उपलब्ध करत आहे. विविध समुदाय आणि संस्कृतींना एकत्र आणणे हे समूहाचे लक्ष्य आहे. किशोर बियाणी हे फ्युचर ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ आहेत. भारतातील आधुनिक रिटेल उद्योगाचे प्रणेते म्हणून किशोर बियाणी हे अनेक उद्योजकांसाठी मार्गदर्शक आणि आदर्श आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये त्यांनी बिग बाजार, सेंट्रल, ब्रँड फॅक्टरी, फूडहॉल, एफबीबी यासारख्या भारतातील काही लोकप्रिय रिटेल चेन तयार केल्या आहेत आणि त्यांचे नेतृत्त्व केले आहे. तसेच निलगिरी, आधार, इझीडे, हेरिटेज, हायपरसिटी, इत्यादींसारख्या विविध किरकोळ साखळीदेखील फ्युचर ग्रुपचा भाग बनल्या आहेत. भारतातील 250 हून अधिक शहरांमध्ये या समूहाचे अस्तित्त्व आहे. दरवर्षी 500 दशलक्ष ग्राहकांना आकर्षित करणे, हे समूहाचे उद्दिष्ट असते. यासोबतच त्यांनी फॅशन, फूड आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील ग्राहकोपयोगी वस्तूंच्या ब्रँड्सच्या विस्तृत निर्मितीमध्ये पुढाकार घेतला आहे, जे समूहाच्या किरकोळ साखळी आणि देशातील इतर विविध आधुनिक रिटेल नेटवर्कद्वारे वितरित केले जातात. समूहाने तंत्रज्ञान, विश्लेषण, अन्न प्रक्रिया, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंग नेटवर्क्समध्येही भरीव गुंतवणूक केली आहे.

१२ ऑक्टोबर १९८७ रोजी कंपनी Manz Wear Pvt Ltd म्हणून समाविष्ट करण्यात आली. मग १९९१ साली २० सप्टेंबर रोजी कंपनीचे Manz Wear Ltd नावाने पब्लिक लिमिटेड कंपनीत रूपांतर करण्यात आले. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी निगमन प्रमाणपत्र अंतर्गत कंपनीचे नाव बदलून Pantaloons Fashion (India) Limited असे करण्यात आले. कंपनी दर्जेदार रेडिमेड कपड्यांचे उत्पादन आणि विपणन यामध्ये गुंतलेली आहे ज्यात ट्राउझर्स, शर्ट्स, डेनिम, ब्लेझर आणि स्लीप सूट यांचा समावेश आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami