संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

‘जी-20’ परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कॅनडाचे पंतप्रधान यांच्यात शाब्दिक वाद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बाली : इंडोनिशायातील बालीमध्ये यंदाच्या जी-२० शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ‘जी-२०′ परिषदेदरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या संभाषणाची माहिती बाहेर उघड झाल्याने जिनपिंग यांनी सर्वांसमोर जस्टिन टुडो यांच्याकडे नाराजी व्यक्त करत याबाबत जाब विचारला. यांनतर टूडो यांनी आपली बाजू मांडली. मात्र यावेळी दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचा एक व्हिडियो सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे या दोघांमध्ये त्याक्षणी जे काही संभाषण झाले तो सुसंवाद नक्कीच नव्हता असेच काहीसे चित्र व्हिडीओमधून समोर येत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कॅनडामध्ये चीनकडून होत असलेल्या हस्तक्षेपाबाबत ट्रुडो यांनी जिनपिंग यांच्याबरोबरच्या चर्चेत नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्यात जे काही सविस्तर संभाषण झाले ते ट्रुडो यांच्या प्रसिद्धी विभागाकडून प्रसिद्ध केल्यावर जिनपिंग यांनी याबद्दल कॅनडाकडे तक्रार केली. आमच्यात जे काही बोलणे झाले, त्याचा सविस्तर तपशील वर्तमानपत्रामध्ये छापून आला आहे. हे योग्य नाही. संभाषण करण्याची ही योग्य पद्धत नाही.’ असे जिनपिंग यांनी म्हटले आहे. जिनपिंग यांच्या या प्रतिक्रियेचे वृत्त काही इंग्रजी दैनिकांनी प्रसिद्ध केले होते.

याबाबत परिषदेच्या शेवटच्या दिवशी शी जिनपिंग यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशी यावेळी झालेल्या भेटीत त्यांच्या पूर्वीच्या बैठकीची झालेली चर्चा बाहेर उघड झाल्याने नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, जर तुम्ही प्रामाणिक असाल, तर एकमेकांशी अत्यंत आदरयुक्त संभाषण केले पाहिजे. अन्यथा याचे परिणाम काय होतील, हे निश्‍चितपणे सांगता येणार नाही, असे जिनपिंग म्हणाले. जिनपिंग यांनी जस्टिन ट्रुडो यांना तक्रारीच्या स्वरात, माध्यमांना प्रत्येक गोष्टीची माहिती देणे चुकीचे असून ते योग्य नाही नसल्याचे म्हटले. तसेच कॅनडा हा स्वतंत्रपणे संवादावर विश्वास ठेवतो, असे ट्रूडो यांनी सांगितले. त्यावर जिनपिंग यांनी, ही बोलण्याची पद्धत नाही, असे म्हटले. ट्रुडो यांच्या प्रतिक्रियेनंतर, जिनपिंग यांनी हसत हसत, “हे छान आहे, परंतु आधी तशी परिस्थिती निर्माण करूया,” असे म्हटले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी हात मिळवले आणि वेगवेगळ्या दिशेने निघून गेल्याचे व्हडियोमध्ये दिसत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami