मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आगीच्या दुर्घटना वारंवार घडत आहेत. ताडदेव येथील कमला इमारतीला लागलेली आगीची घटना नुकतीच ताजी असताना आज जुहू परिसराततील “सी प्रिन्सेस हॉटेल”ला आग लागली आहे. हि आग सकाळी साडे दहा वाजता लागली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, आग लागल्याचं समजताच अग्निशमन दलाचे तीन फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून हॉटल असल्याने लोकांची ये-जा तसेच ग्राहकांची वर्दळ होती, मात्र आग वाढण्याच्या आधीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र मुंबईत आगीचा घटना घडतानाचे चित्र असल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे.