नवी दिल्ली- २०० कोटींच्या मनीलॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या जामीनावर उद्या दिल्ली विशेष न्यायालय निर्णय देणार आहे. जॅकलीनच्या जामीन अर्जावर आज दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने यावर उद्या निर्णय देणार असल्याचे जाहीर केले.
मनीलॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने जॅकलीन फर्नांडिस विरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे तिने जामीनासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. तेथे आज तिच्या याचिकेवर वकिलांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंनी बराच काळ हा युक्तिवाद सुरू होता. त्यामुळे न्यायालयाने यावर अंतिम निर्णय उद्या देणार असल्याचे जाहीर केले. जॅकलीन सध्या हंगामी जामीनावर आहे.