संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

जॅकलीन फर्नांडिसला समन्स! बुधवारी हजर राहण्याचे निर्देश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता दिल्ली पोलिसांकडून जॅकलीनला मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे. 14 सप्टेंबरला जॅकलीनला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. जॅकलीनला याआधी आज 12 सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पण काही कारणांमुळे जॅकलीन आज कोर्टात हजर राहू शकली नाही. त्यामुळे तिला आता बुधवार, 14 सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे समन्स पोलिसांनी बजावले आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाच्या दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरने 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आणि हा पैसा सुकेशने केलेल्या 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणातला होता. जॅकलिनला याची पूर्वकल्पना असताना तिने या भेटवस्तू स्वीकारल्यामुळे तिला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. दरम्यान, जॅकलीनचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. तिचा ‘रामसेतू’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात जॅकलीनसह नुसरत भरुचा आणि अक्षय कुमारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami