नवी दिल्ली- कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. त्यात २ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जेएनयुतील घटनेचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात काही मुलांच्या हातात लाट्या-काठ्या आहेत. त्यांनी आपले चेहरे झाकले आहेत. २ विद्यार्थ्यांमधील वादामुळे हा प्रकार घडल्याचे आणि त्यात राजकीय गटाचा सहभाग नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
जेएनयुतील दोन विद्यार्थ्यांमध्ये काल सायंकाळी कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. त्यात २ विद्यार्थी जखमी झाले. काही मुले विद्यापीठ परिसरात काठ्या घेऊन फिरत होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेमुळे तेथे वाद चिघळला. मात्र दोन्ही गटांनी परस्पर वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांना मारहाण केली. मात्र त्याबाबत पोलिसांकडे कोणीही तक्रार केलेली नाही. २ विद्यार्थ्यांचे हे भांडण आहे. त्यात कोणत्याही राजकीय गटाचा सहभाग नाही, असे पोलिसांनी सांगितले. या वादावर विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.