नवी दिल्ली – देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरूपदी प्रथमच एका महिलेची नियुक्ती झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वादग्रस्त ठरलेल्या प्राध्यापिका शांतीश्री धुलीपुडी पंडित यांची जेएनयूच्या नवीन कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी कुलगुरू जगदेश कुमार यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या या नियुक्तीला अनेक पत्रकारांनी ट्वीटरवरून आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे.
जेएनयूचे माजी कुलगुरू जगदेश कुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर पंडित यांना नेमले आहे. वास्तविक जगदेश कुमार हे त्यांच्या कार्यकाळात वादग्रस्त ठरले होते. विद्यार्थ्यांच्या अनेक आंदोलनाला धुमसत ठेवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न झाला होता. त्यांच्या विद्यापीठातील आक्रमक उजव्या विचारसरणीला केंद्र सरकारचे खंदे समर्थन होते आणि आता पंडित यांची नियुक्ती जेएनयूमधील सर्वोच्च प्रशासकीय स्थानावर करण्याच्या निर्णयातूनही हेच दिसून येत आहे. पंडित या आरएसएसशी जवळीकीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी ज्ञातिसंहार तसेच विद्यार्थी व शेतकऱ्यांवरील हल्ल्यांना उघडपणे पाठिंबा दिलेला आहे. या विद्यापीठात उजव्या विचारसरणीच्या समर्थकांचा मोठा भरणा करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. पंडित यांनी डाव्या व उदारमतवाद्यांना जिहादी असे संबोधले होते. तर महात्मा हत्येचे समर्थन करत अखंड गांधीजींची हत्या अखंड भारतासाठी उपाय असल्याचे वक्तव्य केले होते. टाईम्स नाऊचे संपादक राहुल शिवशंकर यांनी यांच्या कंगनाबाबतच्या एका टिपण्णीला उत्तर म्हणून ही प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी द वायरच्या संपादक अरफा खान आणि ऑड्रे ट्रुशके यांच्यावरही खालच्या पातळीवर टिप्पणी केली होती. त्यामुळे पंडित यांची प्रतिमा आधीच मलीन असताना त्यांची कुलगुरूपदी नियुक्ती केल्याने केंद्राच्या शिक्षण मंत्रालयाच्या धोरणावर सवाल निर्माण झाले आहेत.