नाशिक – जेलरोड-एकलहरे रस्त्यावरील बोराडे चौकातील भंगार दुकान आणि त्यामागील गोदमास आज सकाळी आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या आगीत सुदैवाने कोणताही जिवीतहानी झाली नसून ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
या माहिती मिळाताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अचानक आग लागल्यानंतर दुकान मालक नाजीम शेख आणि नागरिकांनी शक्य तितके भंगार गोण्या बाहेर काढता येईल तेवढ्या दुकानाबाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्नानंतर सकाळी साडेआठ वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आले.