संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

जॉन्सन अँड जॉन्सन चा परवाना रद्द करणं योग्यच! राज्य सरकारच्या दावा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : लहान मुलांच्या आरोग्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सन पावडर हानिकारक असल्याचे मत अन्न व औषध प्रशासनाने घेत या उत्पादनावर बंदी आणली होती. त्यांनतर कंपनीकडून मुंबई हायकोर्टात धाव घेत याबाबतचा अहवाल मागितला. कोर्टाकडून अहवाल उपलब्ध करून देण्याचे सांगत राज्य सरकारलाही आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या पावडर उत्पादनाचा परवाना रद्द करणे योग्य असल्याचा दावा करत तसे प्रतिज्ञापात्रच मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले. मात्र यावर आणखी काही नमुन्याची तपासणी केली आहे का? असा सवाल कोर्टाने उपस्थितीत करत सोमवार १४ नोव्हेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सरकारला दिले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जॉन्सन अँड जॉन्सनच्या ‘बेबी टाल्कम पावडर’ उत्पादनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय योग्यच असून नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचा दावा राज्य सरकारनं हायकोर्टात केला आहे. औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा आणि लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी असलेल्या नियमांची अंमलबजावणी न केल्यास आपल्या कर्तव्याचे पालन करण्यात सरकार अपयशी ठरेल, असा दावाही सरकारनं हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून केला आहे. तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततता महत्वाची मानत त्यानुसार उत्पादन पुरवठा करणं ही याचिकाकर्त्या कंपनीची नैतिक जबाबदारी असल्याने बेबी पावडरच्या गुणवत्तेची खात्री न देता उत्पादन विक्री करता येणार नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारनं या प्रतिज्ञापत्रात घेतली आहे. याची दखल कोर्टाने घेतली असू;न, या बेबी टाल्कम पावडरच्या आणखी काही नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे का? अशी विचारणा करत राज्य सरकारला त्यावर १४ नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami