संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

जोकोविच ऑस्ट्रेलिया ओपनचा विजेता! फायनलमध्ये सीतसीपसीचा पराभव

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मेलबर्न – ऑस्ट्रेलिया ओपनच्या पुरुष एकेरीतील अंतिम फेरीत आज सर्बियाच्या नुवाक जोकोविच याने ग्रीसच्या स्टीफनॉस सीतसीपाशी याचा पराभव करून विजेतेपद पटकावले. तब्बल १० वेळा ऑस्ट्रेलिया ओपनच्या अंतिम फेरीत पोचलेल्या जोकोविच समोर सीतसीफसीचे कडवे आव्हान होते. अंतिम फेरीचा सामना अत्यंत अटीतटीचा झाला. आणि जोकोविच याला टाय ब्रेकरवर विजय मिळाला ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपद पटकावून जोकोविचने राफेरल नादालच्या २२ ग्रॅण्डस्लॅमची बरोबरी केली आहे

नवीन वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनची रविवारी (29 जानेवारी) सांगता झाली. स्पर्धेतील अखेरचा सामना पुरुष एकेरीचा पार पडला. सर्बियाच्या नोवाक जोकोविचने या अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सिपास याचा 6-3, 7-4, 7-6 असा पराभव केला. जोकोविचने दहाव्यांदा या स्पर्धेचा अंतिम सामना खेळत प्रत्येक वेळी विजेतेपद मिळवण्याचा मान मिळवला आहे. तसेच हे त्याच्या कारकिर्दीतील ‌‌‌‌22 वे ग्रँडस्लॅम ठरले.
अनुभवाने काहीशा कमी असलेल्या त्सित्सिपास याच्यावर पहिल्याच सेटमध्ये त्याने 6-3 अशी मात केली. मात्र, त्सित्सिपास याने दुसऱ्या सेटमध्ये भक्कम पुनरागमन केले. टाय ब्रेकरपर्यंत ताणल्या गेलेल्या या सामन्यात त्याने 7-4 अशी मुसंडी मारली. दुसऱ्या सेटमध्ये पुन्हा एकदा त्सित्सिपास याने संघर्ष केला. या सेटमध्ये 6-6 अशी बरोबरी असताना, जोकोविचने पुन्हा एकदा आपला अनुभव दाखवून दिला. टाय ब्रेकरमध्ये जोकोविचने आक्रमक खेळ करताना हा सेट 7-6 असा आपल्या नावे करत विजय मिळवला.

जोकोविचचचे हे 22 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. यासह त्याने राफेल नदाल याच्या विक्रमी 22 ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरी केली. दुसरीकडे, त्सित्सिपास याला आपले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्यासाठी आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या