संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

जोतिबा डोंगराचा रस्ता पुन्हा खचला, वाहतुकीसाठी बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर : ऐन सणासुदीच्या कालावधीत जोतिबा डोंगराचा रस्ता पुन्हा खचल्याची माहिती समोर येत आहे. रस्ता खचल्याने भाविकांना आणि तेथील ग्रामस्थांना वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे.गेल्या तीन वर्षांपासून नवीन पद्धतीने हा रस्ता बांधण्यात आला. पण तरीदेखील सलग तीन वर्ष हा रस्ता खचत असल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
काही दिवसांनी नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार असून अंबाबाईच्या दर्शनासाठी अनेक भाविकांची गर्दी होते. अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर भाविक जोतिबाच्या दर्शनाला जात असतात.मात्र जोतिबा डोंगराचा मुख्य रस्ता पुन्हा एकदा खचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सण-उत्सवात डोंगरावर मोठ्या प्रणामात गर्दी होते. पण आता मुख्य रस्ताच खचल्याने भाविकांची परवड होत असून कोणत्याही क्षणी रस्ता खचला जाऊ शकतो ही भीती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून या रस्त्याची वाहतूक आत्तापासूनच बंद करण्यात आली आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये गायमुख मार्गाने जोतिबा डोंगरावर भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. वारंवार रस्त्याचे काम करूनही अशा पद्धतीने भेगा का पडत आहेत. यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे तर जोतिबाला जाण्यासाठी एक चांगला रस्ता हवाच अशी मागणीही भाविकांकडून करण्यात येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami