संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

‘जोधा अकबर’ फेम अभिनेत्यावर
कॅलिफोर्नियात जीवघेणा हल्ला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कॅलिफोर्निया-भारतातील बॉलीवूडमधील ‘जोधा अकबर ‘ चित्रपटात एक महत्वपूर्ण भूमिका साकारलेला प्रसिद्ध प्रसिद्ध पंजाबी अभिनेता अमन धालिवाल याच्यावर अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये जीवघेणा हल्ला झाला आहे.एका व्यक्तीने अमनवर चाकू आणि कुऱ्हाडीने वार केले. यात तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेतील हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित व्यक्तीने अमनवर हल्ला का केला, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अमन हा कॅलिफोर्नियातील ग्रँड ऑक्स परिसरातील एका जिममध्ये वर्कआऊट करण्यासाठी गेला होता. त्यावेळी एकजण हातात चाकू आणि कुऱ्हाड घेऊन जिममध्ये आला आणि त्याने अमनवर हल्ला केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या