संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

 जो रूटने इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

लंडन – वेस्ट इंडिज विरुद्धच्या पराभवानंतर इंग्लंड क्रिकेट कसोटी संघाचा कर्णधार आणि इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज जो रूट याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने आणि विजय मिळवण्याचा विक्रम जो रूटच्या नावावर आहे
    २०१७ साली आलेस्टर कूकच्या राजीनाम्यानंतर रूटवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्याने २०१८ मध्ये भारतावर ४-१ ने विजय मिळवला होता तर २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेवर ३-१ असा विजय मालवला होता इंग्लंड क्रिकेट संघाचे ६४ सामन्यात नेतृत्व करताना त्याने २७ कसोटी सामने जिंकून दिले होते . तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५२९५ धावाही केल्या आहेत. मात्र विंडीजविरुद्धच्या मालिकेतील पराभव त्याच्या जिव्हारी लागला आणि त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami