सातारा – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला असून वाल्हे गावी मुक्कामी असलेल्या ज्ञानेश्वरांच्या पालखीने सकाळीच लोणंदच्या दिशेने प्रस्थान ठेवले. आज निरामधील दत्त घाटावर या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत केले. ज्ञानेश्वरांच्या पादुकांना निरा नदीच्या पाण्याने स्थान घातले. ही पालखी लोणंदमध्ये आज आणि बुधवारी मुक्कामी राहील. तर गुरुवारी दुपारी चार वाजता ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण आयोजित करण्यात आले आहे. काल तुकाराम महाराजांची पालखी उंदवडी गवळ्यात मुक्कामी होती. आज सकाळी ही पालखी रात्रीचा मुक्काम करण्यासाठी बारामतीच्या दिशेने निघाली. विठोबांच्या जयघोषणात वारकर्यांनी पालखीसोबत उंदवडी पठार, मोरेवाडी, सफार पेट्रोलपंप (बारामती) येथे प्रवेश केला. त्यावेळी या पालखीचे स्थानिकांकडून जंगी स्वागत केले. त्यानंतर ही पालखी रात्रीच्या वस्तीला बारामतीच्या शारदा महाविद्यालयाच्या प्रांगणात मुक्कामाला थांबली आहे.