सोलापूर – दिवसेंदिवस इंधनाचे भाव गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. मात्र या सर्वांमध्ये एक दिलासादायक गोष्ट सोलापूरमध्ये घडली आहे. ज्याचे नाव ‘प्रणिती’ असेल त्याला चक्क एक लिटर पेट्रोल मोफत दिले गेले. हा उपक्रम सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवस निमित्त राबविला.
सोलापूर शहर उत्तरचे काँग्रेस युवक अध्यक्ष महेश लोंढे यांनी हा उपक्रम रबावला.त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाप्रमाणे ज्यांचे प्रणिती नाव असेल त्या महिला, युवतींना एक लिटर पेट्राेल माेफत दिले. त्यासाठी ओळखपत्र पाहून पेट्रोल दिले जात हाेते. सोलापुरात आज जवळपास ८० प्रणिती नावाच्या व्यक्तींना या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आज दिवसभर याचीच चर्चा संपूर्ण सोलापुरात पाहायला मिळाली