संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – १९७०च्या दशकातील क्लासिक हिंदी चित्रपटांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अभिनेते अमोल पालेकर यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी ते रुग्णालयात दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘अमोल पालेकर यांच्या प्रकृतीबद्दल काळजी करण्यासारखे काही नाही. आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा खूप चांगली आहे. अमोल पालेकर यांनी हिंदीसोबतच मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी एका मराठी चित्रपटातूनच आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. अभिनयासोबतच ते उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. अमोल पालेकर यांना एक-दोन नव्हे तर तब्बल ५ वेळा दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘रजनीगंधा’, ‘चित्तचोर’, ‘छोटी सी बात’, ‘गोल माल’, ‘आँखे’ यांसारख्या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अमोल पालेकर यांनी शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘पहेली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करून आपल्या दिग्दर्शन कौशल्याचे अभूतपूर्व सादरीकरण केले होते. अमोल पालेकर गेली अनेक वर्षे चित्रपटांपासून दूर होते. त्यांनी तब्बल १२ वर्षांनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे. नुकतेच ते ‘२००-हल्ला हो’ या चित्रपटात दिसले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami