संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे दुर्धर आजाराने निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर छाप पडणारे जेष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज पहाटे ४.३० च्या सुमारास निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. अनेक महिन्यांपासून मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्मिळ आजाराशी ते झुंज देत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांना उपचारासाठी हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले होते.
अभिनेते अरुण बाली यांनी ९० च्या दशकात कारकिर्दीला सुरुवात केली. “राजू बन गया जंटलमन’, “फुल और अंगारे’, “खलनायक’, “थ्री इंडिएट्स’ आणि पानिपतसह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. छोट्या पडद्यावरील “बाबुल की दुवाये लेती जा’ मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले. “कुमकुम’, “चाणक्य’, “मर्यादा’ आणि “आरोहण’ अशा काही मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami