संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

ज्येष्ठ उद्योजक पद्मभूषण राहुल बजाज यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या बजाज समूहाची धुरा तब्बल 40 वर्षे यशस्वीरित्या वाहणारे ज्येष्ठ उद्योगपती व बजाज समूहाचे माजी अध्यक्ष, पद्मभूषण राहुल बजाज यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते.

राहुल बजाज यांना न्यूमोनिया आणि हृदयविकाराचाही त्रास होता. गेल्या महिनाभरापासून ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टर अखेरपर्यंत प्रयत्न करत होते. मात्र, त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली आणि आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, कोलकात्यातील एका उद्योजक कुटुंबात 10 जून 1938 रोजी राहुल बजाज यांचा जन्म झाला होता. वडील कमलनयन बजाज यांच्याकडून त्यांना उद्योगाचा वारसा मिळाला होता. राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली होती. हॉवर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. 1965 साली राहुल बजाज यांनी आपल्या पारंपरिक उद्योगाची धुरा हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोने नेत्रदीपक प्रगती केली. कंपनीची उलाढाल 7.2 कोटींवरून तब्बल 12 हजार कोटींवर पोहोचली. त्यांच्याच कार्यकाळात बजाज कंपनीने दुचाकी विक्रीमध्ये देशातील आघाडीची कंपनी बनण्याचा मान मिळवला होता. तब्बल 40 वर्षे त्यांनी उद्योगाचे नेतृत्व केले. त्यानंतर 2005 साली त्यांनी आपले सुपुत्र राजीव बजाज यांच्याकडे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे सोपवली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami