संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले यांचे वयाच्या ७५व्य वर्षी अल्पशा आजाराने बुधवारी दुपारी दोनच्या सुमार निधन झाले. डाॅ.कोत्तापल्ले यांना १४ नोव्हेंबर रोजी विषाणू संसर्गाचे निदान झाल्याने पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे डॉ. कोत्तापल्ले यांचा जन्म झाला. मराठी साहित्यात त्यांनी पीएचडी प्राप्त केली. त्यांनतर औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. प्रदीर्घ कारकिर्दीत डॉ. कोत्तापल्ले यांनी अनेक शैक्षणिक तसेच साहित्यिक संस्थांचे पदाधिकारी म्हणून काम केले. मराठी ग्रामीण साहित्यात त्यांचे मोठे योगदान आहे. कथा, लघुकथा, कविता, कादंबरी, तसेच समीक्षा व संपादन अशी त्यांची साहित्यिक कारकीर्द आहे. तर ‘राजधानी’, ‘वारसा’, ‘सावित्रीचा निर्णय’ या त्यांच्या दीर्घकथा प्रसिद्ध आहेत. ‘गांधारीचे डोळे’, ‘मध्यरात्र’, ‘पराभव’ अशा त्यांच्या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत. ‘ज्योतीपर्व’ डॉ. कोत्तापल्ले यांचा हा ग्रंथही प्रसिद्ध आहे. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना राज्य शासनाचे पुरस्कार लाभले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami