संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

झारखंडमध्ये वादळात बोट उलटली; २१ जण बेपत्ता, चार मृतदेह आढळले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रांची – झारखंडमधील जामतारा जिल्ह्यातील धनबादजवळच्या बाराकर नदीत वादळामुळे बोट उलटून २१ जण काम बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहेत. काल गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेत चार जणांना वाचविण्यात यश आले असून शोध घेताना ४ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.

धनबादजवळच्या बारबांदिया पुलाजवळ ही बोट असताना अचानक वादळ निर्माण झाल्याने ही बोट उलटली. या बोटीतील लोक नीरसा, धनबाद येथून जामतारा येथे जात होते. चारजणांना पाण्यातून बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला आहे. एनडीआरएफचे पथक कालपासून बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे.या बोटीवर ३० पेक्षा जास्त लोक बसले होते असे सांगितले जात आहे.यातील काही प्रवासी हे रोजंदारीवर काम करणारे होते. ही दुर्घटना घडल्यानंतर आजूबाजूचे ग्रामस्थ आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले होते. त्यानंतर एनडीआरएफ आणि अन्य बचाव पथके दाखल झाली.आज दिवसभर शोधमोहीम सुरूच होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami