संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

झारखंड विधानसभेत हेमंत सोरेन
यांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रांची – झारखंड विधानसभेत सोरेन सरकारने विश्‍वासदर्शक ठराव जिंकला आहे. 81 सदस्यीय विधानसभेत सरकारच्या बाजूने 48 मते पडली. यादरम्यान भाजपने सभात्याग केला. विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान झाल्यानंतर विधानसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. मात्र सोरेन यांची आमदारकी धोक्यात असल्याने त्यांचे मुख्यमंत्रीपद अजूनही धोक्यात आहे.
झारखंड विधानसभेत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला आहे. सभागृहात पहिल्यांदा अवाजी मतदानाने विश्‍वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर मतांची विभागणी झाली. सरकारच्या बाजूने 48 मते पडली तर विरोधात एकही मत पडले नाही. 81 सदस्यीय विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे 49 आमदार आहेत. सर्वात मोठा पक्ष असलेल्या जेएमएमकडे 30 आमदार आहेत. काँग्रेसचे 18 आणि तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडे (आरजेडी) एक आमदार आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजपचे 26 आमदार असून बहुमताचा आकडा 41 आहे. हेमंत सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजदच्या आमदारांना छत्तीसगडमधील रायपूरमध्ये पाठवलं होतं. सोरेन सरकारनं भाजपकडून आमदार खरेदीचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता.आज सकाळी छत्तीसगडहून विधानसभेत परतलेल्या आपल्या सर्व आमदारांना सोरेन यांनी स्वतः बसने आणले. यावेळी भाजप आमदारांनी विधानसभेसमोर निदर्शने केली. सोरेन यांच्या आमदारांचे छत्तीसगडला जाणे आणि दुमका हत्याकांडाचा मुद्दा ते उपस्थित करत होते. सोरेन यांनी सभागृहात सांगितले की, आम्ही भाजीपाला, रेशन आणि कपडे खरेदी करण्याबाबत ऐकले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami