झी एंटरटेनमेंट व सोनी पिक्चर्सचे विलीनीकरण! पुनीत गोयंकाच सीईओ

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया यांचे विलीनीकरण होणार आहे. या विलीनीकरणाला झी एंटरटेनमेंटच्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत एकमताने तत्त्वतः मंजुरी दिली. विलीनीकरणानंतर नव्या कंपनीत सोनी ११,६०५.९४ कोटींची गुंतवणूक करणार आहे. विलीन झालेल्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पुनीत गोयंका हेच कायम राहणार आहेत. या व्यवहारानंतर ‘झी’कडे ४७.०७ टक्के आणि सोनीकडे ५२.९३ टक्के संयुक्त कंपनीचा हिस्सा राहणार आहे.

सोनी टीव्ही आणि झी एंटरटेनमेंट यांचे टीव्ही व्यवसाय, डिजिटल मालमत्ता आणि प्रोग्रॅम लायब्ररी यांचेही विलीनीकरण केले जाणार आहे. त्याबाबतचा करार दोन्ही कंपन्यांमध्ये झाला आहे. त्यांच्या विलीनीकरणानंतर तयार होणाऱ्या कंपनीमध्ये झी टीव्हीचा ४७.०७ टक्के आणि सोनीचा ५२.९३ टक्के हिस्सा राहणार आहे. या करारातील उर्वरित व्यवहार पुढील ९० दिवसांत पूर्ण केले जाणार आहेत. विद्यमान प्रवर्तकांना आपली हिस्सेदारी ४ टक्क्यांवरून २० टक्के करण्याचा पर्याय आहे. याशिवाय मंडळावरील बहुतेक संचालक नेमण्याचा अधिकार सोनी समूहाला मिळणार आहे. या विलिनीकरणात भागधारक आणि त्यांच्या हिताला कोणतीही बाधा पोहोचणार नाही. विलीनीकरणानंतर सोनी पिक्चर्स १.५७५ अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक संयुक्त कंपनीत करणार आहे. झी आणि सोनी यांचे विलीनीकरण झाल्यामुळे त्याचा फायदा व्यवसाय वाढीसाठी होणार आहे. भागधारकांनाही याचा फायदा होईल, असे झी एंटरटेनमेंटचे अध्यक्ष आर. गोपालन यांनी सांगितले.

Close Bitnami banner
Bitnami