संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

झुंजुं-मुंजुं झालं

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

झुंजुं मुंजुं झाले झुंजुं मुंजुं झाले
कोकिळेच गुंजन सुरू झालं
झाडे वेली डोलु लागली
पिल्ले पाखरे बोलु लागले
दुर देवळात देवाचा गजर
माझ्या कानात जात्याची घर घर
दारि घातल सडा सारवण
त्याने लिपिंयले तुळशी वृंदावन
वासुदेव येई भिक्षे साठी
बाजरीचे सुप असे त्याच्या साठी
आया बाया करती स्वयंपाक
पोर टोर करती कसरत
आजी आजोबा करती देवाचे भजन
रेडिओ वर चाले भजन -कीर्तन
शेतात पिकांना पाटा च पाणी
झुळ झुळ त्यांची ऐकु येती गाणी
मित्र मैत्रिणी निघाल्या शाळेत
राना वनातुनी शोधित पाउल वाट
सुर्य देव येई सरळ डोईवर
रिकाम्या होइ शिदोरया शेतावर
दोन घटका आराम घेऊन
उद्या भेटु आसा सागांवा देऊन

  • – प्रसाद ना गालफाडे
संबंधित बातम्या
आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami