लंडन- युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी युरोपला भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, राजे चार्ल्स (तिसरे), फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. ब्रिटिश संसद आणि युरोपीय महासंघाची संसदेमध्ये भाषणे केली.
रशियाविरोधी युद्धात तग धरण्यासाठी युक्रेनची सर्व मदार ही अमेरिका, युरोपातून होणाऱ्या लष्करी मदतीवर आहे. त्यामुळेच आता लढाऊ विमाने द्यायची तर त्यासाठी एकतर युक्रेनच्या वायूसैनिकांना त्यांचे प्रशिक्षण द्यावे लागेल किंवा मग ब्रिटन, अमेरिका किंवा नाटोला आपल्या वैमानिकांना युक्रेनमध्ये पाठवावे लागेल. अशा समस्यांच्या परिस्थितीत झेलेन्स्की यांनी अचानक युरोपच्या दौऱ्यावर आले होत