संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

झोपेत सर्पदंश झाल्यामुळे भावंडांची प्रकृती गंभीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथे सर्पदंश झाल्यामुळे बहीण भावाची प्रकृती चिंताजनक असून वर्धेच्या सेवाग्राम येथील रुग्णलयाच्या अतिदक्षता विभागात दोघांवर उपचार सुरु आहे. रात्रीच्या गाढ झोपेत सापाने दंश केल्यामुळे दोघांनाही अर्धांगवायूचा त्रास झाला. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून सध्या व्हेंटिलेटरवर आहेत.मण्यार या विषारी सापाने दंश केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गिरड येथील पेठ परिसरात असलेल्या राजू नेहारे यांच्या 15 वर्षीय योगेश आणी 18 वर्षीय योगिता या दोघांना रविवारी रात्री सापाने दंश केला. रात्रीच्या गाढ झोपेत सापाने दोघांना दंश केला. सोमवारी सकाळच्या सुमारास या दोघांना अचानक अशक्तपणा, चक्कर येणे आणी डोळ्याने काहीही दिसत नसल्याची बाब यांनी आपल्या पालकांना सांगितली.पालकांनी दोघांना गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले.सध्या बहिण-भावावर सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.अशी माहिती सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीप्रकाश कलंत्री यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami