काल ३ अंकांनी घसरल्यानंतर झोमॅटोच्या शेअरमध्ये आजही २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. आज झोमॅटोचे शेअर ७९.३० वर ट्रेंड करत होते. मात्र ही परिस्थिती पाहता या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची आता चांगली संधी आहे कारण नंतर कंपनी नफा कमवणार आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, झोमॅटो (Zomato), पॉसिली बाजार (Posili Bazar), पीबी फिंटेक (PB Fintech) आणि नायका (Nykaa) यांच्यासह इतर कंपन्यांच्या शेअर्समध्येदेखील गेल्या वर्षभरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या अनेकांच्या गुंतवणुकीला फटका बसला आहे. मात्र आता तज्ज्ञांचे मत आहे की, येत्या काळात झोमॅटोचे शेअर १०६ अंकांपर्यंत पोहोचू शकतात. रेस्टोरंट फूडची मागणी वाढल्याने कंपनीच्या महसुलात वाढ झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही बरीच जोखमीची असते, त्यामुळे त्यात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.