संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

झोमॅटोनंतर आता स्विगी २५०
कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – अलिकडे अनेक दिग्गज टेक कंपन्यांकडून नोकरकपात झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता फूड डिलिव्हरी ॲप स्विगी कंपनीही कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.मीडिया रिपोर्टनुसार,झोमॅटोनंतर आता डिसेंबर महिन्यामध्ये स्विगी कंपनीही नोकरकपात करण्याची शक्यता आहे. स्विगी ३ ते ५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत आहे.
इकोनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार,या नोकरकपातीमध्ये स्विगीच्या देशभरातील कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे.
स्विगीकडून ग्राहक सेवा विभाग,तंत्रज्ञान आणि उत्पादन विभागातून नोकरकपात होण्याची शक्यता आहे.स्विगीने नोव्हेबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मोठे किचनही बंद केले आहे.स्विगी निवडक लोकांमध्ये अधिक चोखपणे काम करण्याची योजना आखत आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर कर्मचाऱ्यांना रेटींग्स, बोनस किंवा कामावरून टाकण्याच्या निर्णय घेण्यात येईल,असे एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. येत्या काळात स्विगी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना हटवण्यात येऊ शकते.कंपनी सध्या २५० कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता आहे.पण हा आकडा वाढू शकतो.अलीकडच्या काळात अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना हटवले जात आहे.या कंपन्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये समोर आले आहे.
येत्या काळात स्विगी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना हटवण्यात येऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार,कंपनी सध्या २५० कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता आहे.पण हा आकडा वाढू शकतो.अलीकडच्या काळात अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना हटवले जात आहे.या कंपन्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये समोर आले आहे.स्विगी कंपनी सध्या आर्थिक संकटामध्ये सापडल्याचे म्हटले जात आहे.स्विगी ही भारतीय फूड डिलिव्हरी ॲप कंपनी आहे. श्रीहरी मजेटी स्विगीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ आहेत.स्विगीचे एचआर प्रमुख गिरीश मेनन यांनी अलिकडेच कर्मचाऱ्यांना कामगिरीवर आधारित नोकरकपात होण्याची माहिती दिली.ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या मते, स्विगी कंपनीला जानेवारी ते जून दरम्यान ३१५ दशलक्ष डॉलरचं नुकसान झाले आहे. स्विगीने ईमेलद्वारे यावर उत्तर देत सांगितले की, स्विगीकडून सध्या कोणतीही नोकरकपात करण्यात येणार नाही,पण भविष्यात कर्मचाऱ्यांनी हटवण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्विगीआधी झोमॅटो कंपनीनेही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. त्यानंतर आता स्विगी कर्मचाऱ्यांना हटवणार असल्याचे म्हटले जात आहे. झोमॅटो १०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याची माहिती समोर आली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami