नवी दिल्ली – ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्या झोमॅटो युनिकॉर्न झोम च्या ग्लोबल ग्रोथ सेगमेंटचे उपाध्यक्ष सिध्दार्थ झांवर यांनी आपल्या पदाचा अचानकपणे राजीनामा दिला आहे.काल सोमवारी सायंकाळी लिंक्डइन पोस्टद्वारे झांवर यांनी याबाबत माहिती दिली आहे.त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला झोमॅटो नेही दुजोरा दिला आहे.तर दुसरीकडे ब्लींकिट येथील कॅटेगरीच्या संचालक कामयानी साधवानी या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
सिध्दार्थ झांवर यांनी आपला उपाध्यक्षपदाचा राजीनामा देताना लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,वास्तविक झोमॅटोचा कार्यभार हा विलक्षण स्वरूपाचा आहे.कोणताही पर्वत हा कुणीही चढणार नाही इतका उंच असू शकत नाही.तुमची भूतकाळातील ओळख ही तुमच्या भविष्यातील संधीची शक्यता मर्यादित करत नाहीत.पण माझ्या आजूबाजूच्या लोकांमुळे त्याचा अनुभव मला आला आहे.झांवर यांनी हार्वर्डमध्ये शिक्षण घेतले आहे.तर कामयानी या इंडियन स्कूल बिझनेसच्या माजी विद्यार्थिनी आहेत.ब्लींकिट मध्ये सामील होण्याआधी त्यांनी मकेन्झी,कोकाकोला, बेन अंड कंपनी आणि एक्सेंजर सारख्या कंपन्यांमध्ये काम केले आहे.यावर्षी ब्लींकिट ही कंपनी झोमॅटोने विकत घेतली आहे.दरम्यान झोमटो कंपनीचे शेअर्स गेल्या वर्षभरात ५२ टक्क्यांनी घसरले आहे.शुक्रवारी तर झोमॅटोचा शेअर १.२९ टक्क्यांनी घसरून ६३ रुपयांवर बंद झाला होता.या शेअरची मागील ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत ४०.६० रुपये इतकी आहे.काल सोमवारी सकाळी झोमॅटोचे शेअर्स १०६ रुपयांपर्यंत व्यवहार करत होते.